मालवण बंदरजेटीवर या ओ जरा ; स्थानिकांचे पोलीस प्रशासनाला कळकळीचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : मालवण शहरातल्या बंदरजेटी नजिक वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे . राजकोट, मेढा व फोवकांडा पिंपळ येथून एक दिशा मार्गाची माहिती नसलेले पर्यटक त्यांची वाहने तिथून घेऊन येतात व वाहतुकीची कोंडी होते.
स्थानिक मालवण वासियांना,व्यावसायिकांना व व्यापार्यांना त्यांचा प्रचंड त्रास होत असल्याचे सूत्रांकडून समजते.
एस टी स्टॅन्ड,देऊळवाडा सागरी महामार्ग,भरडवरील दोन्ही नाके,रांगोळी महाराज मठ व अन्य ठिकाणसारखाच पोलिसांचा बंदोबस्त बंदरजेटी जवळील जुन्या स्टेट बॅन्क जवळ असावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)