ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
फोंडाघाट येथे शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती या विषयावर शेतकरी प्रशिक्षण
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

फोंडाघाट येथे शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती या विषयावर शेतकरी प्रशिक्षण

प्रकाशन: 21 Aug 2021 06:24 PM
वाचन संख्या 56


कणकवली / उमेश परब : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०२१ -२२ अंतर्गत दि. २३/०८/२०२१ रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय, हवेलीनगर, फोंडा येथे सकाळी ११:०० वा. जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबी अंतर्गत “शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती” या विषयावर शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे.
सदर शेतकरी प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी कणकवली पं.स. चे सभापती मनोज रावराणे यांचे शुभहस्ते व उपसभापती प्रकाश पारकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, मा. प्रकल्प संचालक (आत्मा) सिंधुदुर्ग एस.एन. म्हेत्रे, मा. उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस. हजारे, शेतकरी मल्ला समिती अध्यक्ष (आत्मा) कणकवली वसंत तेंडुलकर, जि.प. सदस्य व शेतकरी सल्ला समिती सदस्य संजय आग्रे, माजी सभापती सौ. सुजाता हळदिवे, ग्रामपंचायत फोंडा सरपंच संतोष आग्रे, ग्रामसेवक भाऊ चौलकर, कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कणकवलीचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. पाटील, कृषी अधिकारी डी.एम. तोरणे, कृ.प. आर.एस. सावंत, कृ.प. व्ही.एच. निकुम, कृषी सहाय्यक सौ. अक्षया परब हे उपस्थित आहेत.
सदर पशिक्षणासाठी क्षताक्षी अ‍ॅग्रो सर्व्हिस, तळेरेचे डीलर व मेकॅनिकल सागर दळी यांचे शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सदर प्रशिक्षणास फोंडा पंचक्रोशीतील यंत्रधारक जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कणकवली यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स