<em>वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहणाचा चौथा वर्धापनदिन १६ मे रोजी</em>…!
बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहणाचा चौथा वर्धापनदिन सोहळा सोमवार दिनांक १६ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त ११ वाजता श्रीसत्यनारायण महापूजा,१२.३० वाजता महाआरती,तीर्थप्रसाद,व महाप्रसाद,सायंकाळी स्थानिक भजन,रात्रौ ८.३० वाजता बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा
” राखणदार “हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)