कोकण चित्रपट महोत्सव 2022 चा बक्षिस वितरण सोहळा…
सिद्धार्थ जाधव ,प्रथमेश परब, नूतन जयंत,आरोह वेलणकर उपस्थित..
नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर सोहळ्याला उपस्थित..
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे कोकण चित्रपट महोत्सवाचा बक्षिस वितरण सोहळा आज सायंकाळी सहा वाजता सुरु झाला आहे.
सिंधुरत्न कलावंत मंचाचे आयोजन असलेला हा सोहळा 09 मे पासून सुरु झाला होता.
या सोहळ्याला मराठी व बाॅलीवुड अभिनेता सिद्धार्थ जाधव,अभिनेत्री नूतन जयंत खोत,अभिनेता आरोह वेलणकर आणि टाईमपास फेम ‘प्रथमेश परब’ यांची विशेष उपस्थिती आहे.
कार्यक्रमातील सर्व सेलिब्रिटी रेड कार्पेटवरुन मामा वरेरकर नाट्यगृह येथे पारंपारिक ढोलताशाच्या गजरात दाखल झाले.
कार्यक्रमाच्या मंचावरील सुरवात दिगंबर नाईक यांच्या मालवणी गार्हाण्याने झाली.
कार्यक्रमाची सुरवात सिद्धेश पालव यांच्या अंबेच्या गोंधळ सादरीकरणाने झाली.
यानंतर आयोजक कोकण कलावंत मंचतर्फे मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये कोकण कलावंत मंचाचा हा चित्रपट महोत्सव याचे हे पहिले वर्ष हे गंगेच्या उगमाप्रमाणे असून जसजसा काळ जाईल तशी ही कलेची गंगा प्रवाहीत होईल असे सांगितले.
मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर,माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा स्मृतीचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला. माजी महेश कांदळगांवकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी यावेळी आयोजकांची प्रशंसा केली. चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन वृद्धी होईल अशी खात्री माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी व्यक्त केली तर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मराठी चित्रपटाला हक्क मिळण्यासाठी स्वर्गीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडकेंच्या ‘सोंगाड्या’ सिनेमासाठी घेतलेल्या भूमीकेची सर्वांना आठवण करुन दिली.
यावेळी आयोजकांतर्फे पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुका अध्यक्ष अवी सामंत, पर्यटन व्यावसायिक गुरु राणे आणि कोणार्क रेस्टाॅरंट व बारचे राजन परुळेकर विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज तंत्रज्ञ,दिग्दर्शक उपस्थित आहेत.
बक्षिस वितरणाचा सोहळा आता सुरु असून यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर,माजी नगरसेवक दीपक पाटकर व अन्य मान्यवर उपस्थित आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)