ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बंदरजेटीनजिकचे स्टाॅलधारक चिंतेत..!

बंदरजेटीनजिकचे स्टाॅलधारक चिंतेत..!

प्रकाशन: 05 May 2022 12:31 PM
वाचन संख्या 357

कोणत्याही क्षणी कारवाईचा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा इशारा…!

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे नोटीशीद्वारे मुदत…!

मालवण | सुयोग पंडित : आज मालवण बंदरजेटी येथील स्टाॅलधारक चिंताग्रस्त झाला आहे.
महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने स्टाॅलधारकांना अंतिम नोटीस देत असल्याचे सांगत स्टाॅल्स हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बंदर निरिक्षकांच्या स्वाक्षरी असलेल्या नोटीसा व त्यातील मुदतीची वेळ व तारीख पाहून स्टाॅल धारकांची एकच गाळण उडाली असून संबंधीत सर्व स्टाॅलधारकांमध्ये घबराट पसरली आहे.

दोन वर्षे कोरोनामुळे ठप्प असलेला पर्यटन हंगाम केवळ तीनच महिने कसाबसा चालला आहे व तो ही आता केवळ पंचवीस दिवस शिल्लक राहीलाय त्यामुळे ही मुदत निदान जून महिन्यापर्यंत द्यायला हवी होती असे स्टाॅलधारकांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे हे स्टाॅल्स मेरीटाईम बोर्डाच्या हद्दीत आहेत व वारंवार नोटीसा देऊनही न हटल्याने आज सायंकाळपासून ही कारवाई कधीही चालू होणार असे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या नोटीशीत नमूद केलेले आहे.
आता स्टाॅलधारक व स्थानिक शासन व प्रशासन याबाबत काय निर्णय घेतात किंवा फेरविचार करतात याकडे स्टाॅलधारक लक्ष लावून आहेत.


स्थानिक लोकप्रतिनिधींच्या याबाबतच्या भूमिकेकडेही स्टाॅलधारक आशेने पहात आहेत असे सूत्रांकडून समजते.

फोटो : प्रातिनिधिक

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स