ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
त्रिंबकच्या जनता विद्या मंदिराला अडीच लाखाची देणगी..! 📗 मुंबई विलेपार्लेच्या 'एक्वा बेनहोलेंट फंड ट्रस्टचे' शैक्षणिक योगदान.

त्रिंबकच्या जनता विद्या मंदिराला अडीच लाखाची देणगी..! 📗 मुंबई विलेपार्लेच्या 'एक्वा बेनहोलेंट फंड ट्रस्टचे' शैक्षणिक योगदान.

प्रकाशन: 05 May 2022 12:28 PM
वाचन संख्या 174

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक या प्रशालेत मुंबई विलेपार्ले येथील एक्वा बेनहोलेंट फंड या ट्रस्ट मार्फत, शालेय भौतिक आणि शैक्षणिक गरजांच्या पूर्तीसाठी अडीच लाख रुपयांची देणगी देण्यात आली. धनादेश स्वरूपातील ही देणगी वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री प्रकाश पेडणेकर यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी पेडणेकर सरांनी घेतलेल्या अपार मेहनती बद्दल आणि शाळेप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाबद्दल माननीय अध्यक्ष श्री प्रताप बागवे तसेच संस्था कार्यकारणी सदस्य श्री अशोक बागवे यांनी कृतज्ञतापूर्वक प्रशंसा केली.

ट्रस्टच्या या भरीव सहकार्यामुळे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठा हातभार लागणार आहे. त्याचा लवकरात लवकर विनियोग करून आपणास त्यापैकी काही सुविधांच्या उद्घाटनास आम्ही निश्चितपणे बोलावू असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष श्री प्रताप बागवे यांनी केले. ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनाही या प्रसंगी मनःपूर्वक धन्यवाद दिले. याप्रसंगी श्री पेडणेकर सर यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री पेडणेकर म्हणाले की, माझे आणि त्रिंबक शाळेचे फार पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आपल्या हातून जेवढे सहकार्य होईल तेवढे आपण केलेले आहे, आणि यापुढेही करत राहू. तसेच संस्थेने देणगी गोळा करण्यासाठी माजी विद्यार्थी भेट, तसेच नवनवीन अभिनव मार्ग यांचा विचार करावा, जेणेकरून ग्रामीण भागातील आर्थिक अडचणीत असलेल्या संस्था निश्चितपणे आर्थिक सक्षम होऊ शकतील. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री प्रवीण घाडीगांवकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री गायकवाड सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री वारंग सर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 283

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स