माजी कृषी मंत्री श्री सदाभाऊ खोत यांची पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या कार्यालयाला भेट
चिंदर | विवेक परब : माजी कृषी मंत्री व रयत क्रांती शेतकरी संघटना अध्यक्ष श्री सदाभाऊ खोत यांचा व्यापारी,मच्छिमार,शेतकरी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा आयोजित केला असून या दौऱ्याची सुरवात सिंधुदुर्ग किल्यावर दर्शन घेऊन सुरवात केली .
त्यांनी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्यालयालाही भेट दिली. दोन वर्षे कोरोना, नैसर्गिक वादळी हवामान मुळे पर्यटन व्यावसायिक,व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्यावेळी त्यांनि आपल्या भागातील झालेल्या नुकसान व सूचना समजून घेऊन यासंबंधी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांचा श्री बाबा मोंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी पर्यटन व्यावसायिक श्री संतोष लुडबे ,श्री दादा वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)