पळसंब ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब ग्रामपंचायत येथे आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिथे ग्राम सेवक अमित कांबळी , उपसरपंच सुहास सावंत सदस्य अरुण माने,कर्मचारी शैलेंद्र अणावकर डाटा ऑपरेटर पाटकर मॅडम उपस्थित होत्या .
यावेळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर व उपसरपंच सुहास सावंत यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांसोबत कामगार दिन व सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती दिनाच्याही विशेष शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)