ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
क्रिकेट खेळात करिअरची संधी असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन…!

क्रिकेट खेळात करिअरची संधी असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन…!

प्रकाशन: 30 Apr 2022 02:05 PM
वाचन संख्या 151

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन…!

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर भारतीय जनता पार्टीतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असून या स्पर्धेतून शहरातील क्रिकेटपट्टू भविष्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील,असा विश्वास नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला.


कणकवली शहर भाजपतर्फे येथील विद्यामंदिर पंटागणावर कमळ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे . या स्पर्धेचे उद्घाटन समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे , नगरसेवक संजय कामतेकर , अँड विराज भोसले,रवींद्र उर्फ बाबू गायकवाड शिशीर परुळेकर,नगरसेविका मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे,राजश्री धुमाळे,प्राची कर्पे,गितांजली कामत,किशोर राणे,बंडू गांगण महेश सावंत,अभय राणे,राजा पाटकर,जावेद शेख,नवराज झेमने,आदी मान्यवर उपस्थित होते.


नलावडे म्हणाले,क्रिकेट खेळाला सुवर्ण दिवस आले आहेत.या खेळात करिअर करण्याची संधी खेळाडूंना प्राप्त झाली आहे.या संधीचा फायदा खेळाडूंनी उठवावा.तसेच शहरातील क्रिकेटपटूंना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल,आशी ग्वाही त्यांनी दिली . यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा शहर मर्यादित असून पहिला सामना वार्ड क्रमांक १ विरुद्ध वार्ड क्रमांक २ या संघामध्ये झाला.या स्पर्धेकरिता १५ हजार रुपये व बकरा व द्वितीय पारितोषिक १० हजार व कोंबडी यासह वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या १७ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी सायंकाळी होणार आहे.या स्पर्धेत पंच म्हणून प्रसाद चव्हाण वश्री. वाळवे यांनी काम पाहिले.समालोचन बाळू वालावकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स