ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अस्थिरोग तज्ञ डॉ. धनंजय रासम यांची किमया व आमदार वैभव नाईक यांच्या सामाजिक बांधिलकीने 'खुब्याचा सांधा' प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अस्थिरोग तज्ञ डॉ. धनंजय रासम यांची किमया व आमदार वैभव नाईक यांच्या सामाजिक बांधिलकीने 'खुब्याचा सांधा' प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी..!

प्रकाशन: 30 Apr 2022 11:11 AM
वाचन संख्या 151

आमदारांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांच्या पाठपुराव्याला निरामय यश.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाची घडामोड सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपजिल्हा या शासकीय रुग्णालयात हीप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजेच (खुब्याचा सांधा बदलणे) ही सांधा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया मालवण तालुक्यातील कट्टा येथील 38 वर्षांच्या तरुणावर पार पडली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी कोणतेही बाहेरून डॉक्टर आणले गेले नाही.

कणकवलीतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर धनंजय रासम यांनी ही यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत या शस्त्रक्रिये करिताचा लाभ संबंधित रुग्णाला मिळाला. तसेच प्रत्यारोपणा करिता लागणारा सांधा हा देखील शासकीय योजनेतून खरेदी करण्यात आला. यासंदर्भातील प्रशासकीय पातळीवर आलेल्या अडचणी या आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सोडवून ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयातील अशा प्रकारे खुब्याचा सांधा प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. तसेच या संपूर्ण शस्त्रक्रियेत दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक सी. एम. शिकलगार यांनी देखील या संपूर्ण प्रक्रिये करता महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील 38 वर्षीय कट्टा येथील या रुग्णाला गेली वर्षभर खुब्याचा सांधा दुखीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्या रुग्णाला नीट चालता देखिली येत नव्हते. त्या रुगणाचे मांडी च्या वरील कमरेला जोडणारे दोन्ही खुब्याचे सांधे खराब झाले होते. याबाबत संबंधित रुग्णाने आमदार वैभव नाईक यांचे या संदर्भात लक्ष वेधल्या नंतर आमदार वैभव नाईक यांनी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठपुरावा केला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी त्यांनी चर्चा करून सांधा प्रत्यारोपणाचा करिता जी एजन्सी जिल्ह्याकरिता मान्यता दिलेली होती त्या एजन्सी जवळ हा सांधा उपलब्ध नसल्याने त्याऐवजी अन्य दुसऱ्या एजन्सीला या योजनेअंतर्गत वरिष्ठ स्तरावरून मान्यता मिळवून घेत आमदार वैभव नाईक यांनी सुमारे 47 हजार किमतीचा कृत्रिम सांधा योजनेअंतर्गत अगदी मोफत मिळवून दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. धनंजय रासम हे कणकवलीत खाजगी प्रॅक्टिस करत असून, त्यानी एनआरएचएम योजनेअंतर्गत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. दुसऱ्या सांध्याची शस्त्रक्रिया नतर करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील ही दिलासादायक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया अगदी मोफत झाली. याकरिता डॉक्टरांचे देण्यात येणारे शुल्क देखील येणारे एनआरएचएम योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनामार्फत अगदी मोफत स्वरूपात या रुग्णाला हे ऑपरेशन करून मिळाल्याने अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय दवाखान्यांमध्ये अगदी मोफत होऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी देखील पाठपुरावा केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स