ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आय पि एस सुब्रमण्य केळकर यांनी केले चिंदरच्या मुलांचे विशेष अभिनंदन व शुभेच्छा मार्गदर्शन.

आय पि एस सुब्रमण्य केळकर यांनी केले चिंदरच्या मुलांचे विशेष अभिनंदन व शुभेच्छा मार्गदर्शन.

प्रकाशन: 30 Apr 2022 10:14 AM
वाचन संख्या 303

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत चिंदरमधील विविध,शाळांनी मिळवले होते सुयश.

चिंदर / विवेक परब : फेब्रुवारी- http://localhost/news/public/uploads/2022 मध्ये घेण्यात आलेल्या BDS स्पर्धा परीक्षेत जि.प.प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडी, कुंभारवाडी, नागोचीवाडी, चिंदर बाजार या शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत पालकरवाडी शाळेचे १००% निकालासह दोन विद्यार्थी सिल्वर मेडलसाठी निवड झाली आहे.    
कु.सार्थक शिवानंद सोलापुरे इयत्ता १ ली 100पैकी 89  गुण  व कु.युवराज दयानंद प्रचंडे इयत्ता 3 री  100 पैकी 90 गुण मिळवत या दोन विद्यार्थ्यांची सिल्वर मेडलसाठी निवड झालेली आहे. तसेच गायत्री प्रचंडे 100 पैकी 77,  मिहिर मनवा मिलिंद चिंदरकर 100 पैकी 74 कृतिका विद्याधर पालकर 100 पैकी 44 गुण मिळवले आहेत.
      

चिंदर कुंभारवाडी शाळेतून कु. श्रेयस राजेंद्र चौगुले याने 100 पैकी 96 गुण मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले. नागोचीवाडी शाळेतून कु. लिखित दुर्वा दिशांत पडवळ याने 100 पैकी 56 तर शुभम रविंद्र पडवळ याने 100 पैकी 47 गुण प्राप्त केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक श्री.शिवानंद सोलापुरे व श्री नंदकुमार जुंदळे यांचे मार्गदर्शन लाभले.
      

या यशाबद्दल आय. पी. एस. सुब्रमण्य केळकर यांनी चिंदर केंद्रप्रमुख श्री.प्रसाद चिंदरकर, शिक्षक संभाजी पवार, यशवंत पाटील शिवानंद सोलापूरे, नंदकुमार, रणजित देवकर जुंधळे,माधुरी पाटील, राजन जोशी, भिमाशंकर शेहसंदी राजेंद्र चौधरी आदींसह पालक,ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

खर अशा BDS सारख्या परिक्षा सुरु होण  आपल्या सारख्या ग्रामिण भागातील मुलांनी सहभाग घेण हेच यश आहे.या यशात आणखी दुधात साखर चांगल यश मिळवतात गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळवतात हि महत्वाची बाब आहे आताच जर परवाची CBSC बोर्डाने नविन नियम लागू केला आहे कि एका वर्गात18 पेक्षा जास्त विद्यार्थी असता कामा नये आणि आम्ही आता पर्यंत अस म्हणत होतो कि मराठी शाळान मध्ये कमी विद्यार्थी आहेत. त्याचा चांगला ‘आऊटपुट’ दिसू लागला आहे. कमी विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांना कमी विद्यार्थ्यांनवर फोकस करुन शिक्षकांना त्यांची चांगली प्रगती करता  येते.

येणाऱ्या काळात विविध परिक्षा असतील. वा स्पर्धेत उतरण हिच मोठी गोष्ट आहे. कारण आपण विहिरीच्या बाहेर येत नाही तो पर्यंत आपल्या जग किती मोठे आहे हे कळत नाही. स्पर्धा परिक्षात यश मिळु देत नाहीतर नको मिळूदेत प्रयत्न करण हिच मोठी गोष्ट आहे.येणाऱ्या काळात चिंदरला चांगले निकाल बघायला मिळतील अशी मला आशा आहे असे आय.पि.एस.अधिकारी सुब्रमण्य केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते सध्या प्रशिक्षणात व्यस्त असल्याने त्यांनी दूर संदेशाद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे.


     

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स