नारींग्रे सरपंचांना सरपंच पदावरून हटवले ; विभागीय आयुक्तांची कारवाई.
देवगड | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारींग्रे ग्रामपंचायतचे सरपंच श्री. श्रीकांत मारूती गांवकर यांनी पाणलोट विकास कार्यक्रमार्गत शासन निर्णयानुसार कामे न करता व मजुरांची रक्कम रू.४०,०००/- स्वत:च्या नावे काढून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे गृहीत धरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) ते दोषी ठरवून त्यांना कोकण आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकले आहे
श्रीकांत गांवकर हे शिवसेनेचे सरपंच होते.
श्री. श्रीकांत मारूती गांवकर, सरपंच, ग्रामपंचायत नारींग्रे यांनी पाणलोट विकास कार्यक्रमातर्गत शासन निर्णयानुसार कामे न करता रोख नोंदवही तसेच पासबुकावरून दि. १८.८.२०२० रोजी र.रू.२०,०००/-,दि.२१.८.२०२० रोजी र.रु.८,०००/- व दि.२१.८.२०२० रोजी र.रू.१२,०००/- अशी एकुण र.
रू.४०,०००/-रक्कम मजुराच्या नावे न काढता स्वतःच्या नावे काढून महाराष्ट्र
लेखसंहिता २०११ नियम २४ (२५) व ५५ च्या तरतूदीचा भंग करून प्रशासकीय व आदिक अनियमितता केल्याचे निदर्शनास आले होते
श्री. श्रीकांत गांवकर, सरपंच, यांनी महाराष्ट्र
ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३) कलम ३८ अन्वये आपल्या कर्तव् कसूर केल्याचे दिसून येते असे कारण दाखवून विभागीय आयुक्त, कोकण विभाग, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) कलम ३९(१) मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये खालीलप्रमाणे आदेश पारित झाला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) कलम ३९(१) अन्वये श्री. श्रीकांत मारुती गावकर, सरपंच, ग्रामपंचायत नारींग्रे,ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग यांना त्यांच्या अधिकार पदावरून तसेच पंचायतीतूनही काढून टाकण्यात येत असल्याचे आदेश जारी झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)