ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निष्पाप वासरु गेलेच आहे जीवानिशी… आता गेट तेवढे दुरुस्त करा…! ( विशेष लक्षवेधी )

निष्पाप वासरु गेलेच आहे जीवानिशी… आता गेट तेवढे दुरुस्त करा…! ( विशेष लक्षवेधी )

प्रकाशन: 27 Apr 2022 06:39 PM
वाचन संख्या 215

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या क्वार्टर्सचे (कर्मचारी वसाहत इमारत)गेट तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे गायीचे वासरू संडासच्या टाकीत पडून मृत्य अवस्थेत आढळले.
ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
प्राथमीक आरोग्य केंद्रातील परिसरात दुर्गंधी पसरली असता स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध सुरु केली.
बंद अवस्थेत असलेल्या क्वार्टर्सच्या मागच्या बाजूने ती दुर्गंधी येत असल्याने तिथे पाहणी केली असता संडासच्या टाकीत मृत अवस्थेत गायीचे वासरू पडलेले आढळून आले.

Article image
Article image

हे वासरू कळसुली येथील सुशांत दळवी यांचे होते. त्यांनी कोणतीही नुकसान भरपाई न मागता ज्यामुळे ही दुर्घटना घडली त्याची दुरुस्ती व्हावी आणि ज्यांच्या मुळे एका निष्पाप मुक्या जीवाचा बळी गेला. संबंधीत हलगर्जीपणाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सुशांत दळवी आणि कळसुली ग्रामस्थांनी केली आहे.

क्वार्टर्स चे गेट लावलेले असते तर गायीच्या वासराचा जीव वाचला असता. कळसुली प्रा.आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षतेमुळे ही घटना घडली असल्याचा ग्रामस्थ आरोप आहे.या घटनेला बेजबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यवाही करा अशी मागणीला जोर धरू लागली आहे.

प्रा.आरोग्य केंद्रातील कॉटर्सच्या परिसरात झाडी-झुडुपे व घाणीचे साम्राज्य,इमारतीची दुराव्यवस्था, यासर्व समस्यांकडे आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांचाही दुर्लक्ष झाला आहे? तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनाने लाखोंनी निधी खर्च करून उभारलेले कॉटर्स मध्ये कळसुली प्रा. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी राहणे बंधनकारक असताना,कर्मचारी राहत ? नाहीत असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनमधून विचारला जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील वाढलेली झाडी,तसेच घाणीचे साम्राज्य वाढले प्राथमिक आरोग्य केंद्रा सभोवताली परिसरातील वाढलेली झाडी व स्वच्छता तसेच कॉटर्स चे तुटलेले गेट तातडीने आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकारी लक्ष वेधावा अशी मागणी ग्रामस्थांनमधून कली जात आहे.

निष्पाप वासरु गेलेच आहे जीवानिशी… आता गेट तेवढे तत्काळ दुरुस्त करावी एवढी संबंधीत यंत्रणेकडून नागरिकांची अपेक्षा आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स