ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तंत्रज्ञानाने चक्र फिरुन 'ते' पाकीट मूळ मालकाच्या स्वाधीन..!

तंत्रज्ञानाने चक्र फिरुन 'ते' पाकीट मूळ मालकाच्या स्वाधीन..!

प्रकाशन: 27 Apr 2022 03:58 PM
वाचन संख्या 857

चिंदर सेवा संघाचे सदस्य प्रसाद टोपले यांच्या सामाजिक बांधिलकीची सर्वत्र प्रशंसा.

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर बाजार येथील श्री.प्रसाद टोपले यांना, आचरा पिरावाडी येथे नवी मुंबईचे श्री सचिन पंडित पाटील यांचे 12,500 रुपये व महत्वाची कागदपत्रे असलेले पाकिट सापडले.
पोस्ट खात्यात काॅन्ट्रॅक्ट धर्तीवर कार्यरत असलेल्या प्रसाद टोपले यांनी त्या पाकिटाविषयी समाज मंचावरील विविध समूहांवर तसेच ‘पळसंब सरपंच’ या वाॅटस् अप समूहावर त्याविषयी तत्काळ माहिती दिली आणि पाकिट मालकांचे नांव,फोटो व पत्ता नमूद करुन त्याविषयी त्यांना संपर्क करायचे आवाहन केले.


या समूहांपैकी ‘पळसंब सरपंच’ समूहावरील ती माहिती आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांच्या निदर्शनाला आली. त्यानंतर त्यांनी त्याला बातमी स्वरुपात प्रसारित केले व चिंदर प्रतिनिधी व एडिटोरिअल असिस्टंट विवेक परब यांनी ती बातमी आचरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक व पोलिस अक्षय धेंडे यांना पाठविली.
यानंतर पोलिसांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे श्री सचिन पंडित पाटील यांना प्रसाद टोपले यांच्यापर्यंत पोहोचणे सुकर झाले.

प्रसाद टोपले यांची भेट घेऊन पाकिटाचे मूळ मालक श्री सचिन पंडित पाटील यांनी त्यांचे पाकिट पुन्हा त्यांच्याकडे घेतले असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान सचिन पंडित पाटील यांचे एक नातेवाईक श्री.नितीन पवार देखील मुंबई येथून या घटनेत समाजमंचावरुन व दूरध्वनीवरुन सहकार्य करत होते.

या घटनेतील प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकी जपणारे श्री प्रसाद टोपले यांचि मुंबई तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स