ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली गटशिक्षणाधिकारी केबिनच्या छप्पराचा भाग कोसळला

कणकवली गटशिक्षणाधिकारी केबिनच्या छप्पराचा भाग कोसळला

प्रकाशन: 20 Aug 2021 01:08 PM
वाचन संख्या 66

सुट्टी दिवशी कोसळल्याने सुदैवाने अनर्थ टाळला

नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याची गरज

कणकवली | उमेश परब : कणकवली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे छप्पर अखेर कोसळले. सुदैवाने गुरुवारी सुट्टीच्या दिवशी हे छप्पर कोसळल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र गटशिक्षणाधिकारी यांच्याच केबिन मधील भाग कोसळला असून संपूर्ण इमारतच पूर्णतः मोडकळीस आली आहे. त्यामुळे या इमारतीतील सर्व कार्यालये तातडीने अन्यत्र किंवा पंचायत समितीच्या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागील शाळा नंबर ४ मध्ये स्थलांतरित करण्यात आला होता. शाळा नंबर ४ च्या या इमारतीत शिक्षण, कृषी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहेत. मात्र ही संपूर्ण इमारत मोडकळीला आली आहे. गेले काही दिवस ठिकठिकाणी पाण्याची गळती होत होती. यातच गुरुवारी सुट्टीदिवशी गटशिक्षणाधिकारी यांच्या केबिन मधील छपराचा काही भाग कोसळला. तर अनेक ठिकाणी इमारतीच्या छपराचा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुट्टीदिवशी हा भाग कोसळल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, पंचायत समितीची नवीन सुसज्ज इमारत तयार असून सभापती मनोज रावराणे यांनी पुढाकार घेत या इमारतीचे शिल्लक काम तसेच ट्रांसफार्मर सहित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. सद्यस्थितीत इमारत तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र उद्घाटन होईपर्यंत या तीनही विभागाना अन्यत्र किंवा नवीन इमारतीत हलविण्याची आवश्यकता आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स