ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीतील वाहतूक कोंडीवर काढण्यात यावा योग्य उपाय

कणकवलीतील वाहतूक कोंडीवर काढण्यात यावा योग्य उपाय

प्रकाशन: 20 Aug 2021 03:02 PM
वाचन संख्या 39

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वेधले महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष

कणकवली | उमेश परब : कणकवलीत वाहतूक कोंडीच्या समस्या एक प्रमुख समस्या निर्माण झाली आहे. कणकवली एसटी स्टँड समोरील उड्डाण पुलाखालून एसटी स्टॅन्डमधून बाहेर जाणाऱ्या व एसटी स्टॅन्डमध्ये येणाऱ्या एसटीसाठी एकच मार्ग ठेवल्याने ही समस्या अजून गंभीर झाली आहे. त्यामुळे एसटी स्टँड मधून बाहेर जाणाऱ्या एसटीसाठी अजून एक मार्ग तयार करा. याकरीता पुलाखाली केलेले बॅरिकेट काढण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता मण्यार यांच्याकडे केली. यावेळी शहरातील महामार्गासंबंधित इतर समस्यांवरही शिवसेनेकडून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक सुशांत नाईक देखील उपस्थित होते.

कणकवली शहरातील हायवेलगतचे पथदिवे सुरू करावे, दोन्ही बाजूच्या सर्विस रोड चे ड्रेनेज खुले करावे, आर. ओ. डब्ल्यू. मधील अतिक्रमण हटवावी, तसेच कणकवली शहरातील महामार्गा लगतच्या विविध ठिकाणच्या रिक्षा स्टॅन्डसाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, आदी मागण्यांसाठी संदेश पारकर यांनी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांचे फोनद्वारे संपर्क साधत लक्ष वेधले. सलिम शेख यांनी येत्या आठ दिवसात मागणी केलेल्या कामांबाबत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपअभियंता श्री. मण्यार, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, दिलीप बिल्डकॉनचे कन्स्ट्रक्शन मॅनेजर समर सिंग, अभियंता अभिजीत पाटील व शहरातील काही रिक्षाचालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स