जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाला गवसला 'अष्टपैलू टीमलीडर….!' ( संपादकीय)
मालवण | संपादकीय : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर झाली. २४ एप्रिल २०२२ ला
जिल्हाध्यक्षपदी अजय शिंदे तर जिल्हासचिव पदी विजय मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे अध्यापक संघाचा जिल्हा मेळावा आयोजित केला होता. भव्य जिल्हा मेळाव्याचे औचित्य साधून दुसऱ्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांमधून या कार्यकारणीची निवड करण्यात आली.
जिल्हा अध्यक्षपदी अजय मधुकर शिंदे कुडाळकर हायस्कूल मालवण, जिल्हा सचिव पदी विजय लक्ष्मण मयेकर कुडाळ हायस्कूल कुडाळ, उपाध्यक्ष विश्वनाथ सावंत कोनाळकट्टा, उपाध्यक्ष संजय परब वेतोरे हायस्कूल, उपाध्यक्ष सुदिन पेडणेकर कणकवली, उपाध्यक्ष जयदीप सुतार वैभववाडी, सहसचिव भाऊसाहेब चवरे, खजिनदार सतीश शिंदे, महिला आघाडी प्रमुख माधुरी खराडे, सदस्य विमल शिंगाडे, विशाल पारकर, शिवराम सावंत, रामचंद्र भानुसे, सुनील बारटक्के , सल्लागार गुरुनाथ पेडणेकर नारायण माने, तानाजी पाटील, फेडरेशन प्रतिनिधी अशोक गीते, प्रकाश कानूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही कार्यकारणी राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक अधिकारी म्हणून टी के पाटील व लक्ष्मण पावसकर यांनी जाहीर केली.
आता जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाला एक असा चेहरा मिळालाय की जो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मुद्द्यांसाठी थेट ‘मैदान स्तरावर’ म्हणजे ग्राऊंड लेव्हलवर जाऊन काम करायच्या मानसिकतेचा आहे. मुळातच एक खेळाडू ,आंतरराष्ट्रीय रेफ्री व प्रशिक्षक म्हणून नावलौकिक असलेले संघाचे नूतन अध्यक्ष श्री अजय शिंदे हे अध्यापनासोबतच सामाजिक व सत्व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. संघबांधणी आणि संघ हाताळणी या त्यांच्या जमेच्या बाजू आता जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाला संघटनात्मक स्तरावर आणखीन क्रियाशील ठेवू शकतात. अजय शिंदे हे जवळपास पंचवीस वर्षे क्रिडा शिक्षक असल्याने संपूर्ण देशामधील विविध शाळा,तेथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विविध राज्यातील शासन स्तरावरील शैक्षणिक घडामोडी यांना जवळून पहात आलेले आहेत. त्यांच्या सर्वांगीण अनुभव व व्यक्तिमत्वाचा प्रभाव सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाच्या वाटचालीसाठी कसा आणि किती परिणामकारक ठरेल याकडे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचे नक्कीच लक्ष असेल. नियम, रचना , शिस्त आणि खिलाडुवृत्ती यांचा संगम पहाताना अध्यक्ष म्हणून संघटनेचे नेतृत्व करताना त्यांच्या सहज आक्रमकतेला इतर सदस्यांचे मिळत जाणारे सहकार्य माध्यमिक अध्यापक संघाचे एक नविन अस्तित्व निर्माण कसे निर्माण करेल हे बघणे महत्वाचे ठरेल.
श्री.अजय शिंदे हे विद्यार्थीवर्गाच्या जाणिवांनाही अचूक हेरणारे असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक अध्यापक आणि सामान्य विद्यार्थी यांच्यातील पुसटशी संवादहीनतेची दरीसुद्धा नक्कीच कमी होईल ही आशा आहे.
तालुका स्तरावरील विषयांना ते कसे हाताळतात व त्याचे जिल्ह्यातील कार्यकारणीमार्फत कसे नियोजन करतात ते पहाणेसुद्धा महत्वाचे आहे.
अजय शिंदे यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी हा अध्यापक संघाला ‘ॲक्टिव्ह’ ते ‘प्रो ॲक्टीव्ह’ या प्रवासाकडे नेऊ शकतो.
नूतन अजय शिंदे यांनी त्यांचे अध्यक्षपदाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणलं की संघटना ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हृदयात असली पाहिजे .एकसंघ असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही एकसंघ राहून संघटना मजबूत करण्यासाठी वेळ देणार जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार तसेच संघटनेला उर्जिता अवस्थेमध्ये आणून जिल्ह्यातील कर्मचार्यांचा प्रलंबित प्रश्न राहणार नाही यासाठी ते सतत प्रयत्न करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाच्या या नूतन कार्यकारणीची वाटचाल आता एका ‘अष्टपैलू टीमलीडरच्या’ नेतृत्वाखाली पहाता येणार आहे. खेळाडू व प्रशिक्षक म्हणून सुसंस्कृत व्यक्ततेसाठी ओळखले जाणारे अजय शिंदे हे संघटनात्मक स्तरावर काम करताना त्यांचे अष्टपैलुत्व कसे पणाला लावतात याची जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्सुकता आहे.
मुख्य संपादक (आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)