सरपंच विरुद्ध उपसरपंच लढतीत उपसरपंच विजयी…!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत एका लढतीची चर्चा संपुर्ण पंचक्रोशीत होती ती म्हणजे भाजपाचे खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर व शिवसेनेचे वायंगणी सरपंच सुमन कामत यांच्या लढतीची.
या लढतीत भाजपाचे खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर यांनी शिवसेनेच्या वायंगणी सरपंच सुमन कामत यांचा पराभव करून विजय मिळवला.
इतर मागास प्रवर्गासाठी झालेल्या लढतीत खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर यांना १०० मते मिळाली तर वायंगणी सरपंच सुमन कामत यांना ८१ मते मिळाली .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)