ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आजपासून दोन दिवस श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्टच्या श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा..

आजपासून दोन दिवस श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्टच्या श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा..

प्रकाशन: 26 Apr 2022 10:58 AM
वाचन संख्या 168

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समर्थ ट्रस्ट मसुरे मर्डे वाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्याचा वर्धापन दिन 26 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे. यावेळी मंगळवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी आठ ते एक रक्तदान शिबिर, गणेश स्तवन, सस्ती पूजन, पादुका पूजन, नांदी श्राद्ध स्थळ शुद्धी, देवता स्थापना, स्वामी पूजन, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, सायंकाळी पाच ते सात मूर्ती पालखी मिरवणूक, सहा ते सात जप आरती, रात्री 9 ते 11 भजने.
उद्या बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी आठ ते एक देवतापूजन, ग्रहस्थापना, जप स्तवन, बलिदान पूर्णाहुति, आरती, एक ते तीन महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी पाच ते सात जप, आरती, रात्री नऊ ते अकरा भजने या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव प्रभुगांवकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स