ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वागदे येथील युवकाची आत्महत्या ; शुक्रवारी रात्रीची घटना….!

वागदे येथील युवकाची आत्महत्या ; शुक्रवारी रात्रीची घटना….!

प्रकाशन: 24 Apr 2022 01:52 PM
वाचन संख्या 269

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे मांगरवाडी येथील महेंद्र केशव घाडीगांवकर(१८) या युवकाने शुक्रवारी रात्री ११.५० हळवल रेल्वे फाटका जवळील रुळावर भरधाव मुंबई हॉलिडे स्पेशल या रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली.

नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. हळदीच्या कार्यक्रमासाठी महेंद्र गेला आणि तेथूनच थेट रेल्वे ट्रकवर जात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसल्याचे सूत्रांकडून समजते.

महेंद्र घाडीगांवकर हा घरातून वागदे नमसवाडी येथील एका हळदीच्या कार्यक्रमाला शुक्रवारी रात्री गेला होता.रात्री १२.३० वाजता भडगाव येथे कामाला जाऊन घरी आल्यानंतर झोपला. सकाळी उठल्यानंतर आई वडील व भावाने पाहिले असता महेंद्र घरी आला नव्हता.त्याची नातेवाईक व शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली.

दरम्यान,तत्पूर्वीच शुक्रवारी रात्री मुंबई हॉलिडे स्पेशल रेल्वे चालकाने कणकवली स्टेशन मास्तर यांना कळवून हळवल रेल्वे फाटका नजीक एका युवकाने उडी मारून आत्महत्या केली आहे असे कळवले होते. त्यानुसार रेल्वे पोलीस अजय भोई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत कणकवली पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रात्री तुकडे झालेला मृतदेह ताब्यात घेऊन शीतपेटीत ठेवला होता. घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,रवींद्र बाईत यांनी पंचनामा केला.

दरम्यान महेंद्र यांच्या नातेवाईकांनी सकाळी शोधाशोध सुरू केली. हळवल रेल्वे फाटका नजीक महेंद्र याची मोटरसायकल आढळून आली,तेथून आजूबाजूला शोधाशोध करत असताना त्याची चप्पलही गावातील नागरिकांना दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी काल एक मृतदेह युवकाचा आढळला आहे तो शीतपेटीत ठेवण्यात आलेला आहे. त्याची अगोदर खातरजमा तथा ओळख करुन घ्यावी असे कळवले. त्यानुसार सदर युवकाची ओळख पटवून तो महेंद्र घाडीगांवकर असल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्या मृतदेहाचे शवविच्छेदन व पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कणकवली पोलिसांनी दिला. शोकाकुल वातावरणात कुटुंबिय व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले.या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.
महेंद्र घाडीगांवकर यांच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स