को .म .सा .प .मालवणतर्फे जागतिक पुस्तक दिन साजरा..!
चिंदर | विवेक परब : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी यांचे संयुक्त विद्यमाने यशवंत मंगल कार्यालय आचरे येथे जागतिक पुस्तक दिन जेष्ठांच्या प्रतिनिधींना ग्रंथ भेट देऊन साजरा करण्यात आला.
आचरे येथील जेष्ठ नागरिक स्नेह मेळाव्यात कोकण मराठी साहित्य परिषदे तर्फे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी कोकण नेते बॅ.नाथ पै यांची विविध चरित्रात्मक पुस्तके जेष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी तसेच विविध पुरस्कार प्राप्त मान्यवर यांना प्रदान केली .
यावेळी डॉ .सुधीर शिवेश्वरकर ,चंद्रशेखर हडप ,बाबाजी भिसळे ,अशोक कांबळी ,अरूंधती कांबळी ,लक्ष्मण आचरेकर ,अनिल पारकर ,सुरेश गावकर ,जकारीन फर्नांडिस ,बाजेल फर्नांडिस ,प्रकाश पुजारे ,श्रीकांत सांबारी ,वामन रेडकर ,सुधाकर कोदे,गोपाळ खेडेकर आदी ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथ दान करून जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला .
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचे जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉ. सुधीर शिवेश्वरकर यांनी या अभिनव योजनेबद्दल को .म .सा .प .मालवणचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)