ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चौके ग्रामस्थ आयोजीत कै. सचिन (आप्पा) गावडे स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...!

चौके ग्रामस्थ आयोजीत कै. सचिन (आप्पा) गावडे स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...!

प्रकाशन: 21 Apr 2022 03:20 PM
वाचन संख्या 119

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके येथील रेवटीच्या मैदानावर कै. सचिन (आप्पा) गावडे यांच्या स्मरणार्थ ४१ वर्षावरील वयोगटासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 26 व 27 एप्रिलला ही स्पर्धा रंगणार आहे.
इच्छुक संघांनी खालील क्रमांकावर प्रवेशासाठी संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे.
राजा गावडे 9422633308,
मोहन गावडे 7499368721,
चंदन कांबळी 9404129897,
मंदार गावडे 9404752121.

प्रथम पारितोषिक रक्कम १५, ५५५/- व आकर्षक चषक
द्वितीय पारितोषिक रक्कम ११,१११/-व आकर्षक चषक असे मोठे इनाम स्पर्धेचे आकर्षण आहेत.
मालिकावीर -२,२२२ चषक, उत्कृष्ट फलंदाज १,१११ चषक,उत्कृष्ट गोलंदाज १,१११ व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक १,१११ अशी भरगच्च वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे असतील.
प्रत्येक सामना ६ षटकांचा राहील तसेच कमितकमी ४ गोलंदाज वापरले जातील.
प्रत्येक संघाने सामना सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असून
संघ उशिरा आल्यास दंड लावण्यात येईल. सामन्यात पंचांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धेच्या स्वरुपाविषयी व प्रक्रियेविषयी आयोजकांचे निर्णय अंतिम असतील. इच्छुकांनी त्याची नावं 24 /4/public/uploads/2022 तारखेपर्यंत नोंदवलेलीच स्विकारली जाईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
स्पर्धेसाठी ओळखपत्र अनिवार्य असेल असेही स्पष्ट केले गेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स