चाफेड गावठण येथील निलेश उर्फ निवृत्ती घाडीगांवकर यांचे निधन..!
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील रहिवाशी निलेश उर्फ निवृत्ती चंद्रकांत घाडीगावकर (४१) यांचे मंगळ दि. १९ एप्रिल रोजी मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,विवाहित बहीण,भावोजी,काका,आत्या,चुलत भाऊ,चुलत बहिणी,आजी असा मोठा परिवार आहे.त्यांचे मूळ गाव जरी चाफेड असले तरी गेली अनेक वर्षे साळशी सरमळेवाडी येथे त्यांचे वास्तव्य होते.त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती.त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता.सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.साळशी सरमळेवाडी येथील श्री वटेश्वर मंदिरात महाशिवरात्र च्या कार्यक्रमात ते दरवर्षी उपस्थित राहायचे.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सैनिक नगरी पतसंस्था शिरगांव शाखेचेचे कर्मचारी कुलदीपक घाडीगांवकर यांचे ते चुलत भाऊ होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)