राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये मराठी भाषाविषयक फलक व निर्देशनासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांना युवासेनेतर्फे निवेदन..!
चिंदर | विवेक परब : समृद्ध अशा मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असताना मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे आणि इतर संलग्न महाविद्यालयांची नावे ठळक अक्षरांत व मराठी भाषेत दर्शनी (प्रवेशद्वार) भागात लावण्यात यावीत यासाठी युवासेनेर्फे निवेदन देण्यात आले आहे.
सोबत प्रवेश अर्ज, माहितीपत्रक,सूचना फलक मराठीत असावे तसेच २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात यावा,असे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,महाराष्ट्र मान.श्री.उदय सामंत यांना युवासेना सिनेट सदस्य श्री.प्रदीप सावंत,राजन कोळंबेकर,संदेश पारकर ,झोरे,सौ.शितल शेठ देवरुखकर आणि कणकवली जिल्हा युवासेना अधिकारी श्री.सुशांत नाईक यांनी दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)