ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>वैभववाडी पाठोपाठ तरळे बाजारपेठेत चोरीचा मामला…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>वैभववाडी पाठोपाठ तरळे बाजारपेठेत चोरीचा मामला…!</em>

प्रकाशन: 18 Apr 2022 11:58 AM
वाचन संख्या 101

एका व्यापार्याच्या चार लाखाहून अधिकची रोख रक्कमेवर डल्ला..

नियोजनबद्ध टोळी सक्रीय असल्याचे स्पष्ट संकेत..

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून तालुक्यात काल चोरट्यांनी धुडगूस घातल्यानंतर आज सोमवारी पहाटे तरळे बाजारपेठेतील तब्बल 12 हून अधिक दुकाने चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका दुकानदाराची तब्बल 4 लाखाहून अधिक कॅश चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान आज सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ बाजारपेठेतील धाव घेतली. मात्र चोरट्यांनी अनेक दुकानांच्या गल्ल्यावर डल्ला मारला. चोरट्यांनी रेकी करून ही दुकाने फोडली असण्याची शक्यता आहे.

कारण ज्या दुकानांच्या आतील भागात घरे आहेत अशी दुकाने फोडली नसल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे देखील सोमवारी पहाटेपासूनच तरळे येथे दाखल झाले असून, त्यांच्याकडून कसून शोध सुरू आहे. वैभववाडी नंतर कणकवली त्यापाठोपाठ आता तरळे मध्ये देखील चोरट्यांनी दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर आता तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच येथील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र खुलेआमपणे चोरट्यांचा वावर सुरू असताना पोलिसांकडून आता ठोस उपाय योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली. पहाटे तीन ते साडेचार या वेळेत बुरखाधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पुढील चोर्‍या टाळण्यासाठी या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स