दोनच दिवसांत अनेक 'युवासैनिक' परतले पुन्हा स्वगृही..!
कणकवली | प्रतिनिधी : दोनच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वागदे येथील अनेक युवासैनिकांनी नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला होता.
यात युवासैनीक ओंकार घाडीगांवकर महेंद्र घाडीगांवकर व इतर वागदे नमसवाडी व मांगरवाडी येथील कार्यकर्ते तेजस घाडीगांवकर, रुपेश सरंगले, चंदन घाडीगांवकर ,विशाल घाडीगांवकर ,तुषार घाडीगांवकर, प्रशांत घाडीगांवकर , शैलेश घाडीगांवकर ,रोशन घाडीगांवकर आनंद गोसावी ओंकार दाभोलकर ,गणेश दाभोलकर यांचा समावेश होता.
आता हे सर्वजण माजी जिल्हा बॅंक अध्यक्ष सतिश सावंत व युवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत व युवासेनेत स्वगृही दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले ,कन्हैया पारकर रामदास विखाळे, रुपेश आमडोसकर ,ललित घाडी गांवकर,रविंद्र गावडे, गणपत घाडीगांवकर ,शिरीष घाडीगांवकर बाळा आर्डेकर ,अमित घाडीगांवकर ,किशोर घाडीगांवकर ,शरद सरंगले अजित घाडीगांवकर ,अमित घाडीगांवकर संतोष गुरव व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
वागदेतील या युवासैनिक व शिवसैनिकांच्या स्वगृही परतण्याने तालुक्यातील राजकारणात एका जलद नाट्यमय घडामोडीची नोंद झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)