ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कमळ चषक क्रिकेट स्पर्धेत युवा शक्ती बाजार पेठ कुसुर संघ विजेता..!

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेत युवा शक्ती बाजार पेठ कुसुर संघ विजेता..!

प्रकाशन: 18 Apr 2022 12:04 PM
वाचन संख्या 61

विश्वशांती हेत , भुतेश्वर क्रिडामंडळ,रायझींग स्टार कोळपे संघ चमकले..

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उंबर्डे येथे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या कमळ चषक क्रिकेट स्पर्धेत युवा शक्ती बाजार पेठ कुसुर संघाने विजेतेपद पटकाविले.द्वितीय क्रमांक विश्वशांती हेत, तृतीय क्रमांक भुतेश्वर क्रीडा मंडळ तर चौथा क्रमांक रायझिंग स्टार कोळपे यांनी पटकाविला.
कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत अंडरआर्म स्पर्धा उंबर्डे येथे पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, सरपंच एस.एम. बोबडे, उपसरपंच श्री. दशरथ दळवी, चिटणीस श्री. प्रकाश काटे, श्री. प्रदीप दळवी, श्री. वासुदेव पावसकर, श्री.आत्माराम शिवगण, कादिर फारास, विजय संकपाळ, महेश चव्हाण, सचिन दळवी, गणेश शिवगण, उंबर्डे ग्रामस्थ, गांगेश्वर मंडळ पदाधिकारी व सदस्य, भुतेश्वर मंडळ पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत मालिकाविर – योगेश, युवा शक्ती बाजार पेठ कुसुर, उत्कृष्ट फलंदाज संदेश, विश्वशांती हेत, उत्कृष्ट गोलंदाज अक्षय पांचाळ, भुतेश्वर क्रीडा मंडळ, क्षेत्ररक्षक प्रणय शिवगण यांना चषक देऊन गौरविण्यात आले. नासिर काझी म्हणाले, स्पर्धेचे आयोजन अत्यंत कौतुकास्पद आहे. आमदार साहेब सदैव युवकांच्या व जनतेच्या पाठीशी आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी युवा वर्गाला क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हुसेन लांजेकर क्रिडा स्पर्धेचे कौतुक केले व विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
बोबडे सर यांनी जि. प. गटाची स्पर्धा असली तरी संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किशोर दळवी यांचे योगदान खूप मोठं आहे. नियोजनाचे संपूर्ण श्रेय किशोर दळवी यांना दिले पाहिजे. तसेच गांगेश्वर मंडळ व भुतेश्वर मंडळ यांचं सहकार्य खूप मोलाचे लाभल्याचे सांगितले. आभार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी यांनी स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्व मान्यवर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ, ग्रामपंचायत उंबर्डे, गांगेश्वर मंडळ, भुतेश्वर मंडळ, सर्व सहभागी संघाचे आभार मानले. तसेच मोठ्या स्पर्धा न भरवता जि.प. गट व शहर स्पर्धा भरवून स्थानिक युवा वर्गाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मा. श्री.नितेशजी राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स