ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वरवडे नळयोजना डीपी अखेर सुरक्षितस्थळी

वरवडे नळयोजना डीपी अखेर सुरक्षितस्थळी

प्रकाशन: 19 Aug 2021 01:25 PM
वाचन संख्या 40

भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

कणकवली | उमेश परब : वरवडे गावच्या मुख्य नळयोजनेच्या ट्रान्सफॉर्मर-डीपी सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. गेले काही महिने यासाठी मागणी करण्यात आलेली होती. भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. यावेळी सदरची डीपी नदीपात्रालगत असल्याने व लाईनही पाण्यातूनच येत असल्याने येणाऱ्या समस्याबाबत पुन्हा चर्चा करण्यात आली होती. नदीला पूर येतो, त्यावेळी सदर ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे ४-५ दिवसांपर्यंत योजना बंद राहते, याकडे लक्ष वेधण्यात आले होते.

यावेळी आठ दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार सदरची लाईन रस्त्याच्या बाजूने पोल उभे करून घेत योजनेच्या पंप शेड लगत डिपी बसवण्यात आला आहे. सदरच्या कामाची पाहणी भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांनी नुकतीच केली सोबत वरवडे प.स.शक्तिकेंद्रप्रमुख सदा चव्हाण,उपसरपंच सिरील फर्नांडिस,ग्रा.प.सदस्य अमोल बोन्द्रे, प्रदीप घाडीगांवकर, प्रमोद गावडे, ग्रामसेवक पावसकर, हनुमंत बोन्द्रे, विजय कदम, रतन देसाई, संजय सावंत, अनिल घाडीगांवकर, रमा घाडीगांवकर, गुरुदास घाडीगांवकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स