अंगणवाडी सेविका मोबाईल करणार परत…!
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत मात्र ते निकृष्ट असल्याने दुरुस्तीसाठी सेविकांना खर्च करावा लागत आहे. अंगणवाडी सेवीकांना शासकीय कामासाठी देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या, सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ॲप द्या, या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी गेले पंधरा दिवसात सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या मागण्या लेखी सादर केल्या आहेत. परंतु शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांनी १७ ऑगस्ट पासून मोबाईल वरून काम बंद केले आहे. कुडाळ येथे २० ऑगस्ट सावंतवाडी येथे २३ ला कणकवली येथे २४ ला दोडामार्ग येथे २५ ला वेंगुर्ले येथे २६ ला देवगड येथे २७ ऑगस्ट सप्टेंबर मालवण येथे १ सप्टेंबर वैभववाडी येथे २ सप्टेंबरला कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी आंदोलन छेडणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)