ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हरकुळ बुद्रुक येथील श्रेया घाडीचा सन्मान !

हरकुळ बुद्रुक येथील श्रेया घाडीचा सन्मान !

प्रकाशन: 19 Aug 2021 02:15 PM
वाचन संख्या 34

आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड्स प्रदान; डोंबिवली येथे कार्यक्रम

कणकवली / उमेश परब : मनुष्य विकास लोकसेवा अकादमी , मुंबई या  संस्थेच्यावतीने  ‘राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार २०२० ‘ सोहळ्याचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते.  या सोहळ्याअंतर्गत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील मूळ रहिवासी व  डोंबिवली ,विष्णूनगर येथील  स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे शिक्षण घेणाऱ्या व नृत्यकला निपूण असलेल्या श्रेया सुंदर घाडी हिला आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले‌ आहे.

     सेवानिवृत्त शिक्षक  रघुनाथ सदाशिव घाडी यांची नात असलेल्या श्रेया हिने  नृत्यविष्काराच्या जोरावर रसिक मनावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. अकरा वर्षाच्या श्रेया हीने आपल्या वयाच्या चौथ्या वर्षापासून आतापर्यंत बऱ्याच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.  
          देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीला तीच्या डान्स क्लास मध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील शिक्षीका रूपाली जाधव, शुभांगी जोशी आणि तीचे गुरू  प्रशांत वसंत आंबडस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
       तीने आतापर्यंत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ‘मीच महाराष्ट्राची लावण्यवती’, ‘लावणी सम्राज्ञी’, ‘पदन्यास’, सह्याद्री वाहिनी वरचा ‘डान्सिंग स्टार ,शोध नव्या डान्सचा ‘तसेच ऑनलाइन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धे मध्ये पण यश संपादन केले आहे.तीने आतापर्यंत आधार रत्न पुरस्कार, घाडीगावकर समाज विशेष कर्तृत्व सन्मान (कला नृत्य) पुरस्कार मिळवले आहेत.  आतापर्यंत तीने  १०० नृत्यस्पर्धांमध्ये विजेती ठरली आहे.
        या सिंधुकन्येने आपल्या कलाविष्काराने अनेकांना भुरळ घातली आहे.ती डोंबिवली तील सायरन डान्स अॅकॅडमी मध्ये नृत्याचे शिक्षण घेत आहे . तीने आपल्या यशाचे श्रेय तीचे आई ,वडील व तिचे गुरू नृत्यदिग्दर्शक  प्रशांत आंबडस्कर तसेच तीच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स