कणकवली तालुक्यातील भरणी शाळेत शेतीशाळेच्या पहिल्या वर्गाचे उदघाटन
शिरगाव |संतोष साळसकर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, भरणी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)सन २०२१-२२अंतर्गत काजू पीक विषयावर शेतीशाळेच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन झाले.. सदर शेतीशाळेच्या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस.हजारे,कृषी अधिकारी डी.एम.तोरणे,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) व्ही.एम.पाटील,शेतकरी सल्ला समिती सदस्य आनंद साळसकर,नामदेवराव मराठे कृषी महाविद्यालय फोंडा येथील विषयविषेशज्ञ प्रसाद ओगले सर,अनुरेखक धनावडे साहेब,कृषी सहाय्यक श्रीम.विशाखा रावराणे,तसेच भरणी गावातील काजू बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
सदर शेतीशाळा च्या वर्गात आत्माचे ए.टी.एम.व्हि.एम.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कृषी सहाय्यक श्रीमं.विशाखा रावराणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली,उपविभागीय कृषी अधिकारी श्री हजारे यांनी शेतीशाळा घेण्यामागचा उद्देश,विषयानुसार वर्गाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.प्रसादओगले सर यांनी काजू पीक लागवडी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शेती शालाच्या नियोजनासाठी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे तसेच कृषी सहाय्यक श्रीमं.विशाखा रावराणे यांनी मोलाचे सहकार्य केले..या शेतीशाळे च्या वर्गास भरणी गावच्या शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)