शिरगांव येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे आणि भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न......!
शिरगांव | संतोष साळसकर :केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे आणि भाजपा पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संदीप साटम यांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी बहुसंख्य रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम, माजी जि.प.सदस्य सुभाष नार्वेकर, माजी सभापती नंदू देसाई,प.स. सदस्या.सौ.अपूर्वा तावडे,मंगेश लोके,राजेंद्र शेट्ये,सुधीर साटम, हडपिड सरपंच दाजी राणे, चाफेड माजी सरपंच आकाश राणे, चाफेड चे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण राणे, तोरसोळे सरपंच महेश पवार, तोरसोळे सोसायटी चेअरमन अरविंद पवार, माजी उपसरपंच सुरेश राणे,डॉ. वाय.एस.चव्हाण,डॉ.अश्विनी कोटुरवार,जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अमित आवळे,अधीपरीचारिका प्रांजली परब,समुपदेशक सुनील वानोळे,किशोर नांदगावकर,नितीन गावकर,उल्हास राणे,सुरेश डोंगरे,आदींसह भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते,रक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळी महिला सन्मान होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महिलांचा कार्यक्रम येथील हनुमान मंदीरात संपन्न झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)