ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गाबीत चषक 2022 चे शानदार उद्घाटन…!

गाबीत चषक 2022 चे शानदार उद्घाटन…!

प्रकाशन: 11 Apr 2022 11:51 AM
वाचन संख्या 301

मालवण | सुयोग पंडित : मालवण दांडी येथील एकेश्वर मित्रमंडळाची मानाची अशी ‘गाबीत चषक http://localhost/news/public/uploads/2022’ स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध झालझुल मैदानावर आज झाले .

11 एप्रिल ते 15 एप्रिल चालणार्या या चुरशीच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 30,000/_ व आकर्षक चषक असून उपविजेतेपद मिळवणार्या संघाला रुपये 15,000/_ व आकर्षक चषक अशी प्रमुख बक्षिसे आहेत.मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक , फलंदाज व गोलंदाजांनाही वैयक्तिक लक्षवेधी बक्षिसे आहेत.

या स्पर्धेचे स्वरुप एक गांव एक संघ असे असून संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आयकाॅन खेळाडू खेळविण्याची मुभा दिली गेली आहे.एकेश्वर मित्रमंडळातर्फे आयोजीत या स्पर्धेत तुल्यबळ संघ आणि खेळाडूंना पाहण्याची संधी सर्वांना मिळत आहे .

एकेश्वर मित्रमंडळाच्या या गाबीत चषक स्पर्धेच्या उद्घाटनाला मालवणचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक श्री सुदेश आचरेकर व इतर विशेष मान्यवरांमध्ये प्रशांत सामंत , युवा नेते हरी खोबरेकर,
सन्मेष परब, युवा नेते लीलाधर पराडकर, समाज सेवक अन्वय प्रभू,रश्मीन रोगे,छोटू सावजी,पत्रकार महेंद्र पराडकर ,क्रिकेट प्रशिक्षक व खेळाडू हेमंत मेस्त, क्रिकेट प्रशासक व खेळाडू गोविंद ऊर्फ बंटी केरकर ,नाना नाईक,दिलीप घारे,मेघनाद धुरी,सहदेव बापार्डेकर, सौ. चारुशीला आचरेकर ,सौ. अंजना सामंत व इतर दांडी नागरीक व खेळाडू उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स