ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>भाजपाचे मनसुबे उधळत वाघेरी सोसायटी शिवसेनेकडे..!</em>

<em>भाजपाचे मनसुबे उधळत वाघेरी सोसायटी शिवसेनेकडे..!</em>

प्रकाशन: 11 Apr 2022 09:48 AM
वाचन संख्या 68

युवासेनेच्या सिद्धेश राणे यांची कार्यपद्धती ठरली प्रभावी..!

कणकवली | प्रतिनिधी : एकापाठोपाठ एक धक्के देत वाघेरी मध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाचे मनसुबे उधळून लावले आहेत. माजी सभापती मनोज रावराणे व माजी सरपंच संतोष राणे यांनी वाघेरी सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना मात्र शिवसेनेचे 11 संचालक विजय होत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीकरिता युवा सेनेचे सिद्धेश राणे यांची मेहनत कामी आली आहे. वाघेरी मध्ये शिवसेना वाढीसाठी सिद्धेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे फळ या निवडणुकीच्या निकालातून मतदारांनी दिले आहे.

या निवडणुकीत शिवसेनेची विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे – मुरलीधर रमाकांत राणे- 109, अनंत काशिनाथ राणे- 107, मकरंद अशोक राणे- 101, विश्राम परशुराम राणे- 98, श्रीकांत चंद्रकांत राणे- 98, संतोष बाळकृष्ण कदम- 94, सहदेव विश्राम मोंडकर- 94, तुकाराम गुरव – 95, गोपाळ कदम- 102, सुहासिनी राणे- 109, स्नेहलता नेवगे- 94 यांनी यश मिळवले. सोसायटीवर शिवसेनेने निर्विवाद बाजी मारल्यानंतर शिवसेना नेते सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, आदींनी भेट देत नवनिर्वाचित संचालकांची अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघेरकर, विभागप्रमुख बाबू रावराणे, राजू रावराणे, बबन नारकर, संजय पारकर, युवा शाखाप्रमुख अमोल गुरव, शाखाप्रमुख दत्तात्रय राणे, दिनेश राणे, सुनिल राणे, अनिल राणे, मंगेश नेवगे, एकनाथ वाघेरकर, राजेश कदम, किर्तीकुमार पाटील, मुरारी राणे, का.वा. राणे, रविंद्र राणे, गणेश राणे, निलेश भोगले, केदार रेवडेकर, दिलीप कदम, गजानन राणे, उपसरपंच अनुजा राणे, आत्माराम राणे, दत्ता राणे, विनेश राणे, मनोहर कदम, दिनेश पेडणेकर, सिद्धेश मोंडकर, दीपक कदम, एकनाथ राणे, नितीन कदम, संजय कदम, प्रकाश सुतार, रामदास कदम, नामदेव तावडे, महेश मोंडकर आदी शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स