बांदा येथे प्रभु रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुकीस भाविंकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.....!
बांदा |राकेश परब : श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने बांदा आळवाडा येथील साईभक्त कै बाप्पा केसरकर यांच्या साईमठामध्ये रविवारी रामनवमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सकाळी प्रभु रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक बांदेश्वर मंदीर पासुन बांदा साईमठापर्यंत काढण्यात आली. शेकडोंच्या संख्येत हिंदुबंधु भगीनीनी व भाविकाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. साईमठात पहाटे साईना अभ्यंग स्नान,काकड आरती साईदत्त पुजा,दुपारी रामनवमी उत्सव,महाआरती तिर्थ, महाप्रसादचा भाविकांनी सायंकाळी उशीरा पर्यत लाभ घेतला. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ अध्यक्ष राकेश केसरकर व मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)