ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाला ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाला ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..

प्रकाशन: 18 Aug 2021 06:37 PM
वाचन संख्या 43

विजेत्या स्पर्धकांना कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. सतीश सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव..

कणकवली / उमेश परब – ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेमार्फत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

नेहमी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणारी प्रशाला अशी या प्रशालेची ख्याती आहे. सदर स्पर्धा ही चार गटात घेण्यात आली.
*गट क्रमांक १ मध्ये इ. ५वी/६वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझा आवडता क्रांतिकारक – भगतसिंग हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या गटात यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे चैतन्य अरविंद शिरसाट – प्रथम
,कु. तनुश्री प्रसाद मसुरकर – द्वितीय,अथर्व गंगाराम तांबे – तृतीय,कु. लावण्या तुकाराम खोचरे – उत्तेजनार्थ प्रथम,
कु. कृपा अनिल पेडणेकर – उत्तेजनार्थ द्वितीय,
या गटासाठी सौ. न्हिवेकर एस्. एम्. आणि श्री. सावंत डी. व्ही. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

गट क्रमांक २ मध्ये इ. ७वी/८वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझा आवडता क्रांतिकारक – स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या गटात यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे कु. मैत्रेयी मकरंद आपटे – प्रथम,
कु. रूतिका बाळकृष्ण सांगवेकर – द्वितीय,कु. गार्गी रामेश्वर सावंत – तृतीय,कु. योजना संदीप काणेकर – उत्तेजनार्थ प्रथम,कु. समिक्षा सुखदेव जाधव – उत्तेजनार्थ द्वितीय,या गटासाठी सौ. साटम एम्. एम्. आणि श्री. मसुरकर पी.एन् यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

गट क्रमांक ३ मध्ये इ.९वी/१०वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझा आवडता क्रांतिकारक – वासुदेव बळवंत फडके हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या गटात यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे कु. सानिका रामदास काळसेकर – प्रथम,कु. हृतिका रविकांत पेंडुरकर – द्वितीय,कु. अपूर्वा चारूहास आडकर – तृतीय,यशवर्धन मारोती गायकवाड – उत्तेजनार्थ प्रथम,कु. निर्जरा सुखदेव जाधव – उत्तेजनार्थ द्वितीय,
या गटासाठी श्रीम. हाटले पी. एल्. आणि श्री. आपटे एम्. एन्. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

गट क्रमांक ४ मध्ये इ.११वी/१२वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. देशाच्या जडणघडणीत क्रांतिकारकांचे योगदान हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.या गटातील यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे – अमोल संजय जाधव-प्रथम ,कु. अक्षता अरविंद सावंत – द्वितीय,
कु. जुई सुधाकर सावंत – तृतीय
कु. पायल रामचंद्र पारकर – उत्तेजनार्थ,
या गटासाठी श्री. कोरडे बी. डी., सौ. म्हाडेश्वर पी. पी. आणि सौ. पटेल एच्. बी. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सर्व विजेत्या स्पर्धकांना कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. सतीश सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट २०२१ या देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सन्मा. श्री. ए. एस्. सावंत यांनी यांनी बक्षिसांचा सर्व खर्च केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई चे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. एल्. डी. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन सहाय्यक शिक्षक श्री. मकरंद आपटे व श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स