ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मसुरे केंद्रशाळेची नेहा, यशश्री प्रथम
मसुरे | प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पंचक्रोशी ठाकर समाज पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गट क्रमांक एक मधून जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं.१ ची विद्यार्थीनी कु. नेहा महादेव शिंगरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गट क्रमांक २ मधून कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. या दोघांनाही रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. दोघांच्याही यशा बद्दल कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)