ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत रंगली मालवणी भाषा दिवसाची मैफिल
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत रंगली मालवणी भाषा दिवसाची मैफिल

प्रकाशन: 05 Apr 2022 12:25 PM
वाचन संख्या 42

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर ठरले विशेष आकर्षण

चिंदर | विवेक परब : सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली आयोजित मालवणी कवी सम्मेलन 04 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सायंकाळी शिवशक्ती हॉल मध्ये पार पडले. मच्छिंद्र कांबळी यांचा हा जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या प्रतिमेला वंदन करून व मालवणी भाषेच्या वाढीसाठी गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

भोवताल कार मालवणी कवी विनय सौदागर यांनी त्यांच्या खालव काय आणि खातव काय, पावस येताहा, कैद, आजून व्हाळयेक पाणी हा या लोकप्रिय कविता सादर केल्या.

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाचा सुरुवातीचा खडतर प्रवास व नन्तर पु ल देशपांडे यांच्या चांगल्या अभिप्रायाने हे नाटक कसे यशस्वी झाले याचा उलगडा केला. स्वतःच्या जीवनातील अर्धवट किशोर वयात
म्हैसम्मा नावाची एक मुलगी त्यांच्यावर प्रेम करत होती, याची अधुरी गजाल त्यांनी सांगितली.

मालवणी बोलाचा डेरिंग, भाषेक उर्जितावस्था मच्छिंद्र कांबळे व गंगाराम गवाणकर यांच्या वस्त्रहरण नाटकाने आली असे म्हणत सम्मेलनाचे अध्यक्ष सुनंदा कांबळे यांनी सपनात येव नको, कोजागिरी, रामायणाची गजाल या सुंदर मालवणी कविता सादर केल्या.

उदय सरपे, सुरेश पवार, स्वप्नील वेंगुर्लेकर, सरिता पवार, साक्षी हर्णे, प्रगती पाताडे, सतीश चव्हाण , राजेंद्र गोसावी, प्रसाद पंगेरकर इ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. डॉ प्रफुल्ल आंबेरकर, डॉ सुधाकर ठाकूर, डॉ अशोक कदम, शुभांगी पवार असे अनेक काव्यरसिक उपस्थित होते.

सूत्रसंचालन रीमा भोसले यांनी तर आभार सुरेश पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सिंधुवैभव साहित्य समूहाच्या शैलेश घाडी, ओंकार चव्हाण, मीनाक्षी चव्हाण, माधवी चव्हाण, हृतिक मेस्त्री, मनाली राणे व डॉ सतीश पवार यांनी परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स