भाजपाचे कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिशजी धोंड उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्याची भाजपाची बैठक संपन्न
चिंदर | विवेक परब : वेंगुर्ले भाजपाची संघटनात्मक बैठक कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिशजी धोंड , जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी – सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली. ६ एप्रिल – भाजपा स्थापना दिन व १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती हे दोन्ही कार्यक्रम बुथस्तरावर आयोजित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बुथरचना व शक्ती केंद्र सक्षम बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भाजपा स्थापना दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रत्येक बुथ वर पोहचवण्यासाठी नियोजन करण्यात आले. तसेच स्थापना दिनानिमीत्त प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर तसेच सार्वजनिक ठिकाणी पक्षाचे झेंडे उभारणेबाबत नियोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये पक्षाने दिलेले कार्यक्रम कशाप्रकारे राबविण्यात आले या बाबत आढावा घेतला , तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात ” कार्यक्रमाची माहिती घेण्यात आली. तसेच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना(बाळू)देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, महीला मोर्चा ता.अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके व अँड सुषमा खानोलकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी, नगरसेविका साक्षी पेडणेकर व श्रेया मयेकर व कृपा मोंडकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, परबवाडा सरपंच व अँप संयोजक पपु परब, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर व नारायण कुंभार, महिला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर, शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक – सुधीर गावडे, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी,ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर परब इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)