ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राज्य नाट्यस्पर्धेत  उत्कृष्ट  नेपथ्यावर अंकुश कांबळी यांची मोहोर!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्य नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट नेपथ्यावर अंकुश कांबळी यांची मोहोर!

प्रकाशन: 05 Apr 2022 12:32 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मालवण तालुक्यातील रेवंडी गावचे सुपुत्र अंकुश कांबळी याना रत्नागिरी येथे झालेल्या ६० व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट नेपथ्या साठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. “तुका म्हणे आता ” या नाटकासाठी सदर पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी १६ नाटकांमधून ही निवड झाली आहे. यापूर्वी सुद्धा अनेक पुरस्कारांनी अंकुश कांबळी यांचा सन्मान करण्यात आला आहे.राज्य नाट्य स्पर्धेत अंकुश कांबळी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने अध्यक्ष भास्कर आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे, आनंद आंगणे, शशी आंगणे, मधु आंगणे, नंदू आंगणे, बाळा आंगणे, बाब्या आंगणे, छोटू आंगणे, प्रसिद्ध रंगभूषाकार व मूर्तिकार तारक कांबळी तसेच आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स