ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
५० हजार कोविड लस लवकरच सिंधुदुर्गासाठी उपलब्ध

५० हजार कोविड लस लवकरच सिंधुदुर्गासाठी उपलब्ध

प्रकाशन: 18 Aug 2021 12:49 PM
वाचन संख्या 53

कणकवली | उमेश परब : गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली आहे त्यामुळे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी पर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर मा. मुख्यमंत्री यांचा भर आहे. कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यादा लसींचा पुरवठा करावा अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रत्राद्वारे केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ५० हजार कोविड लस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती वैभव नाईक यांच्या द्वारे मिळत आहे . सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने चाकरमानी येतात परंतु कोरोणाचे संकट अजूनही आहे त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होते आवश्यक आहे. दुसऱ्या डोसची कमतरत भासत असल्याने आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे लसींचा मागणी केली होती त्यानुसार मागे २० हजार लसींचा पुरवठा झाला होता त्यातील १५ कोविशिल्ड तर ६ हजार कोव्हॅक्सीनच्या लस होत्या तसेच गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ हजार कोविड लसी पुरवण्यात आल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स