तारकर्ली येथील रस्ते उपोषण स्थगित
सा बां उपविभागीय अधिकार्यांनी घेतली दखल
आपली सिंधुनगरी चॅनेलने समस्येवर टाकलेला प्रकाश
मालवण | वैभव माणगांवकर : देवी केळबाई देऊळ ते देवबाग रस्त्याच्या काॅक्रिटीकरणासाठी काल सकाळपासून ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला स्थगिती दिली गेली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री नितिन दाणे यांच्या उपोषणस्थळी येऊन घेतलेल्या भेटीनंतर व लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी सदर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दिनांक पाच सप्टेंबर पर्यंत ह्या रस्त्यावर जांभा दगड आणि खडीच्या सहाय्याने खड्डे बुजविले जातील आणि लवकरच सदर रस्त्याचे पक्के काम निविदा काढून केले जाईल असे सा बां विभागाकडून सांगण्यात आले.
श्री सुरेश बापार्डेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात
प्रसाद बापर्डेकर ,वैभव सावंत सौ. मधुरा मकरंद चोपडेकर,प्रकाश बापर्डेकर ,कुणाल बापर्डेकर, वसंत मोंडकर, महेंद्र चव्हाण,अविनाश राऊळ,गुंडू कांदळगावकर,सौ.गायत्री बापर्डेकर,किशोर कुबल ,संतोष बांदेकर,बाबू टिकम,नेरूरकर, मिथिलेश मीठबावकर,शरद माडये, बाळा पाटकर,नारायण माडये,शिवाजी केळुसकर, व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आपली सिंधुनगरी चॅनेलने उपोषणाच्या सुरवातीपासूनच या संपूर्ण रस्त्याच्या समस्येवर प्रकाश टाकला होता म्हणून ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)