ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात फसवणुकीच्या हेतूने वावरतेय तरुण, तरुणींची टोळी…

मालवणात फसवणुकीच्या हेतूने वावरतेय तरुण, तरुणींची टोळी…

प्रकाशन: 18 Aug 2021 02:00 PM
वाचन संख्या 130

लहान मुलांच्या शिबिराचा बहाणा सांगून घेतली जातेय माहिती

संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

मालवण | वैभव माणगांवकर : परजिल्ह्यातून तरुण, तरुणीची टोळी सर्वत्र खोटा बहाणा सांगून फिरत आहे. लहान मुलांच्या आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे असे सांगून घरातील लहान मुलांची नावे तसेच अन्य माहिती घेण्याच्या हेतूने ही टोळी तालुक्यात सक्रिय आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही आरोग्य शिबीर नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अश्या संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
गेले काही दिवस तरुण व तरुणी शहरातील विविध कॉम्प्लेक्स अन्य घराघरात जात लहान मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून त्यासाठी मुलांची नावे तसेच अन्य माहिती घेत आहेत. यात त्यांच्याकडून शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे सांगितली जात आहेत. नागरिकांनी आयडीकार्ड विचारले असता आयडी कार्ड बनवायला दिले आहे असं सांगण्यात आले. काहींनी संबंधित डॉक्टराना संपर्क केला असता त्या भुरट्यानी तिथून काढता पाय घेतला. त्यामुळे ही टोळी फसवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय बळावला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अशी टोळी किंवा व्यक्ती घरी आरोग्य शिबिराचे कारण सांगून आल्यास पूर्ण शहानिशा करून तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स