'गाबीत चषक 2022' स्पर्धा रंगणार 'झालझुल' मैदानावर..!
एकेश्वर मित्रमंडळाची ‘एक गांव एक संघ’ स्वरुपातल्या चुरशीची टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी येथील मानाची अशी ‘गाबीत चषक http://localhost/news/public/uploads/2022’ ही स्पर्धा मालवणच्या प्रसिद्ध झालझुल मैदानावर आयोजीत केली गेली आहे. 11 एप्रिल ते 15 एप्रिल चालणार्या या चुरशीच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 30,000/_ व झळाळता चषक असून उपविजेतेपद मिळवणार्या संघाला रुपये 15,000/_ व चषक अशी प्रमुख आकर्षक बक्षिसे आहेत.
मालिकाविर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक , फलंदाज व गोलंदाजांनाही वैयक्तिक बक्षिसे आहेत.
या स्पर्धेचे स्वरुप एक गांव एक संघ असे असून संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आयकाॅन खेळाडू खेळविण्याची मुभा दिली गेली आहे.
एकेश्वर मित्रमंडळातर्फे आयोजीत या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये 4,000/_ असून अधिक माहितीसाठी श्री.रोगे 9860022116 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)