सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवींचा आंदोलनाचा इशारा..!
लोकांच्या जीवाला घातक गतिरोधक तत्काळ हटविण्याची मागणी.
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील कळसुली- हळवल मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यकता नसताना स्पीड ब्रेकर घातले. अपघातांचे क्षेत्र नसून, वाहनचालकांची मागणी नसताना स्पीडब्रेकर घालण्यात आलेत.
आवश्यकता नसलेल्या स्थानांवर हे गतिरोधक घातले गेल्याचा आरोप आहे. या स्पीड ब्रेकरमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हळवल गावातील हे स्पीडब्रेकर तातडीने हटवा अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी दिला आहे.
हळवल गावात ठिक-ठिकाणी चढउतार भागांत स्पीड ब्रेकर बांधकाम विभागाने चार दिवसांपूर्वी घातले असून, नवख्या वाहकाना या स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नाही, स्पीडब्रेकर तातडीने हटवा वाहनचालकांसह, स्थानिक नागरिकांनमधून मागणीला जोर धरू लागली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)