ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोमसाप मालवणतर्फे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन.

कोमसाप मालवणतर्फे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 03 Apr 2022 01:22 PM
वाचन संख्या 78

चिंदर | विवेक परब : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांच्यावतीने राज्यस्तरीय “चैत्र पालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे” आयोजन शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.काव्यलेखनाचा विषय- “निसर्ग कविता” आहे. स्पर्धेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.

१) सदर स्पर्धा राज्यस्तरीय व खुल्या गटासाठी असून सर्व कवी सहभागी होवू शकतात.

२) स्पर्धेसाठी लिहिलेली कविता १६-२० ओळींपेक्षा जास्त नसावी.

३) कविता ही आशयसंपन्न आणि व्याकरण दृष्ट्या परिपूर्ण असावी.

४) परिक्षकांनी दिलेला निकाल अंतिम राहील. त्यात कोणताच फेरबदल होणार नाही.

५) दिलेल्या विषयावर अभिजात व्याकरणाचे मान्यताप्राप्त असलेला कवितेचा कुठलाही प्रकार चालेल.

६) स्पर्धकाने आपल्या स्वरचित कवितेच्या वाचनाचा व्हिडिओ बनवून १० एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत श्री. गुरुनाथ ताम्हणकर (9420738375) या नंबरवर पाठवावा. सोबत आपला एक फोटो, पत्ता व लिखित कविताही पाठवावी.

७) कविता वाचनाचे व्हिडिओ कोमसाप मालवणच्या You Tube Chanel वर शुक्रवार दिनांक १५ एप्रिलला (कवीवर्य सुरेश भट यांच्या जन्मदिनी) प्रसारित करण्यात येतील.

८) या व्हिडिओंना मिळालेले लाईक्स व परीक्षकांचे गुणदान यावरुन निकाल.

शुक्रवार दिनांक २२ एप्रिल (जागतिक वसुंधरा दिन)रोजी जाहिर करण्यात येईल. लाईक्स साठी 10 गुण व परीक्षकांचे 90 गुण असतील.

९) प्रथम तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव केला जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.प्रथम क्रमांक ३००० रु. व प्रमाणपत्र.द्वितीय क्रमांक २००० रु. व प्रमाणपत्र.तृतीय क्रमांक १००० रु. व प्रमाणपत्र.

अधिक माहितीसाठी संपर्क श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, (स्पर्धा संयोजक तथा उपाध्यक्ष कोमसाप मालवण.) – 9420738375 यांचेशी करावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे अशी विनंती कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स