ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>साऊथ मालवण चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्सुकता शिगेला..!</em>

<em>साऊथ मालवण चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्सुकता शिगेला..!</em>

प्रकाशन: 31 Mar 2022 07:54 AM
वाचन संख्या 107

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेटची लक्षणीय स्पर्धा..!

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण क्रिकेट क्लब असून संपूर्ण व्यावसायिक तथा काॅर्पोरेट स्तरावरची आखणी करणार्या तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे आयोजीत ‘साऊथ मालवण चॅम्पियन ट्रॉफी’ या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ही स्पर्धा मालवणच्या दक्षिण भागातील खेळाडूंना लेदर क्रिकेटचे मैदान क्षेत्र मिळवून देणारी असून ती http://localhost/news/public/uploads/2021 पासून सुरु झालेली एक लक्षवेधी क्रिकेट स्पर्धा आहे.

ही उन्हाळी क्रिकेट स्पर्धा तारकर्ली गावाच्या शेजारील गावांतील क्रिकेटपटुंना लेदर क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध करून देते.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या वर्षी या स्पर्धेत ऍक्वा मॅजिक देवबाग, डि. सी. सी वायरी, दांडी चॅलेंजर्स, आणि तारकर्ली क्रिकेट क्लब हे 4 संघ सहभागी होत आहेत.

येत्या 6 ते 9 एप्रिल दरम्यान मालवण एज्युकेशन सोसायटीच्या टॉपिवाला बोर्डिंग मैदानावर हि स्पर्धा रंगणार आहे.
ग्रामीण भागातून भविष्यात लेदर क्रिकेट स्तरावरील दर्जेदार खेळाडू घडावेत हा ही स्पर्धा आयोजित करण्या मागचा उद्देश आहे अशी माहिती तारकर्ली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष हर्षवर्धन रोगे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स