सौ.माधुरी मेस्त्री नेमळेकर यांनी केले डाॅक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गचे अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन.
गव्हर्निंग काऊन्सील सदस्यांनाही दिल्या विशेष शुभेच्छा.
मालवण |सुयोग पंडित : श्री स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटर,कोळंब ,मालवणच्या संस्थापक व मुख्य संचालक सौ.माधुरी मेस्त्री नेमळेकर यांनी डाॅक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गचे सन्माननीय अध्यक्ष डाॅ. श्री.राजेंद्र पाताडे आणि सचिव डाॅ.श्री.सुहास पावसकर यांचे अभिनंदन केले आहे.
डाॅक्टर राजेंद्र पाताडे व सुहास पावसकर यांच्याकडे ही जबाबदारी दुसर्यांदा सुपूर्द करण्यात आली आहे.
कोरोना काळापासून व पूर्वीही डाॅक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गच्या सर्व सन्माननीय सदस्य डाॅक्टर्सनी,गव्हर्निंग काऊन्सीलनी त्यांच्या आरोग्य सेवेचे जे समाज योगदान दिले आहे त्याला नेहमीच वंदन आहे असे प्रतिपादन सौ.माधुरी मेस्त्री नेमळेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)