ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
गुढीपाडव्याला बांदा पतंजलीच्या योग प्रभात फेरीचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गुढीपाडव्याला बांदा पतंजलीच्या योग प्रभात फेरीचे आयोजन.

प्रकाशन: 27 Mar 2022 10:35 PM
वाचन संख्या 35

बांदा | राकेश परब : चैत्र शुद्घ प्रतिपदा म्हणजे यंदा
दि. २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजता हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडवा दिवसाचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समिती तर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.


सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व साधक आणि बांदा शहरातील इतर सर्व नागरिक यात सहभाग घेणार आहेत.


ही प्रभात फेरी श्री बांदेश्वर मंदिर बांदा येथून सकाळी सात वाजता निघेल. नंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रोड, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी ग्रामपंचायत इमारत च्या मार्गे पुन्हा श्री बांदेश्वर मंदिर येथे येऊन या योग प्रभात फेरी ची सांगता होईल.


या योग प्रभात फेरी मध्ये “करे योग रहे निरोग” या जयघोषाचा उल्लेख असावा. योग ही आपली संस्कृती आहे आणि योगाभ्यास करणे व इतरांना करावयास लावणे हे कार्य पतंजली योग समिती बांदा ने हाती घेतले आहे व या कार्याला प्रतिसाद वाढत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स