ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुपोषीत बालकांची नोंद केंद्र सरकार 'पोषण ॲप' द्वारे करणार   ;भाजपा वेंगुर्ले च्या वतीने 'स्वस्थ बालक बालिका' अभियान अंतर्गत सुदृढ मुलांना प्रमाणपत्राचे वितरण प्रसंगी दिली माहिती.

कुपोषीत बालकांची नोंद केंद्र सरकार 'पोषण ॲप' द्वारे करणार ;भाजपा वेंगुर्ले च्या वतीने 'स्वस्थ बालक बालिका' अभियान अंतर्गत सुदृढ मुलांना प्रमाणपत्राचे वितरण प्रसंगी दिली माहिती.

प्रकाशन: 26 Mar 2022 05:58 PM
वाचन संख्या 72

चिंदर |विवेक परब : आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून व महाराष्ट्राचे लोकनेते मा. देवेंद्र फडणवीस विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र राज्य मा.चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात “स्वस्थ बालक बालिका अभियान” संपूर्ण राज्यात दिनांक 21 मार्च ते 27 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 या दरम्यान जिल्ह्याच्या व मंडलाच्या अंगणवाडी व बुथ स्तरावर यशस्वीपणे राबवायचे असल्याने त्याचा शुभारंभ कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली व वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान अंतर्गत “स्वस्थ बालक बालिका अभियान” हे संपूर्ण देशात २१ मार्च ते २७ मार्च या कालावधीत आयोजित करावे असे सर्व राज्याला कळवले होते परंतु महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना चे कारण सांगून अभियानच रद्द केले. म्हणूनच सदर अभियान भाजपाच्या वतीने घेण्यात आले असे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.


यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण म्हणाले की ० ते ६ वर्षा मधील मुलांची उंची, वजन व वय या निकषांवर स्वस्थ बालकांना प्रमाणपत्र व ‘POSHAN APP’ द्वारे नोंद केली जाणार आहे . जेणेकरून कुपोषित बालकांना केंद्र सरकार कडून सकस आहार पुरविण्यासाठी मदत होईल.
यावेळी या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक एस्. एस्. काळे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोष जगताप, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर, महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले, रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व आकांक्षा परब, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, हळदणकर , भुषण जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
तसेच अंगणवाडी सेविका स्मिता कोनेकर – सुनीता कांबळे – नयना आरेकर तसेच पालक – पुजा सावंत , रुचीरा दाटेकर, तृप्ती माणगांवकर, नेहा गवस, दर्शना मोरजकर, गजानन वेर्णेकर, आचल डांगरेजा, गायत्री जगताप, मंजिरी मोरे, माधवी जगताप, प्रणाली पार्सेकर, साधना मिसाळ इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स